Remdesivir black market: मोठे रॅकेट अकोला पोलिसांच्या जाळ्यात! आरोपींची संख्या 18 पर्यंत पोहचली; दर्यापूरच्या डॉक्टरचा समावेश,7 मे पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी

                                      file photo





अकोला : कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयोगी ठरत असलेले रेमडेसिविर या इंजेक्शनचा राज्यभर मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या काळाबाजार प्रकरणात अकोला पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 18 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची अजून कसून चौकशी सुरू असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीं मध्ये  दर्यापूर (अमरावती) येथील एका डॉक्टराचा समावेश आहे. या डॉक्टर सह अकोल्यातील सहा आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक केली. यानंतर या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





अकोल्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती वरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा गाव येथील डॉक्टर सागर सहदेव मेश्राम (वय २३) यास अटक केली. मेश्राम याचे अकोल्यात असलेले साथीदार आनंदराम अभिलाष तिवारी (वय २२) रा. कैलास टेकडी, सुमित महादेव वाघमारे रा. शंकर नगर, कोमल वानखडे रा. सुधीर कॉलनी या चार आरोपींना अटक केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असताना निकिता नारायण वैरागडे रा. डाबकी रोड व शिवनगर येथील रहिवासी कार्तिक मोहन पवार (वय २५) या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सहाही आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.




या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत १८ आरोपींना अटक केली असून सुमारे ३० पेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याचा उलगडा या आरोपींकडून झालेला आहे. तर या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




18 आरोपींची यादी


डॉ. सागर सहदेव मेश्राम रा, येवदा,      आनंदराम अभिलाष तिवारी, सुमित महादेव वाघमारे, कोमल वानखडे, अंकित संतोष तिकांडे, रा. मोठी उमरी, देवेंद्र संजय कपले, रा. मोठी उमरी, शुभम दिनेश वराडे, रा. लाडीस फैल, निकिता नारायण वैरागडे, रा. डाबकी रोड, अभिषेक जगदीश लोखंडे रा. मोठी उमरी, कार्तिक मोहन पवार रा. शिवनगर, गौतम नरेश निधाने, रा. शिवाजी नगर, आशिष समाधान मते, राहुल गजानन बंड रा. भारती प्लॉट जुने शहर, सचिन हिमत दामोदर रा. अशोक नगर अकोट फैल, प्रतीक सुरेश शहा, रा. रामनगर, अजय राजेश आगरकर, रा. बाळापूर नाका, सोनल फ्रान्सिस मुजमुले रा. लहरिया नगर व मंगेश प्रभाकर राऊत रा इंजिनिअरिंग कॉलनी मोठी उमरी या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

टिप्पण्या