Pandharpur byelection2021: पंढरपूर पोटनिवडणूक: समाधान अवताडे यांनी मारली मुसंडी; घेतली ३ हजार ८०० मतांची आघाडी!

                                     file photo




देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा जोरदार सुरू असताना महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या निकालाची चर्चा सुरू आहे. पंढरपुरात सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  भाजपाचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट रंगत सुरू आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांना पंधराव्या फेरीअखेर ३ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली आहे.





मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडे यांनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडे यांना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मत मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालके यांनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत भालके यांनी ३ हजार ११२ तर अवताडे यांना २ हजार ६४८ मत मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालके यांनी ६३५ मतांची आघाडी मिळवली. भालके यांना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत.  आवताडे यांना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत.



पाहू या फेरी नुसार निकाल



पहिली फेरी

समाधान अवताडे – २ हजार ८४४

भगीरथ भालके – २ हजार ४९४

आघाडी – अवताडे (४५० मत)



दुसरी फेरी

समाधान अवताडे – २ हजार ६४८

भगीरथ भालके – ३ हजार ११२

आघाडी – भालके (५०० हून आधिक)



तिसऱ्या फेरी

समाधान अवताडे – ७ हजार ९७८

भगीरथ भालके – ८ हजार ६१३

आघाडी – भालके (६३५ मत)



चौथी फेरी

समाधान अवताडे – ३ हजार ३२५ (एकूण मतं – ११ हजार ३०३)

भगीरथ भालके – ३ हजार ३२८ (एकूण मत– ११ हजार ९४१)

आघाडी – भालके (६३८ मत)



पाचवी फेरी

समाधान अवताडे – २ हजार ७५६ (एकूण मतं – १४ हजार ५९)

भगीरथ भालके – २ हजार ७७६ (एकूण मतं – १४ हजार ७१७)

आघाडी – भालके (७०० हून अधिक)



सहावी फेरी

समाधान अवताडे – ३ हजार १५९ (एकूण मतं – १७ हजार २१८)

भगीरथ भालके – २ हजार ६९५ (एकूण मतं – १७ हजार ४१२)

आघाडी – भालके (१९४ मतांनी)



सातवी फेरी

समाधान अवताडे – २ हजार ९९५ (एकूण मतं – २० हजार २१३)

भगीरथ भालके – १ हजार ९६८ (एकूण मतं – १९ हजार ३८०)

आघाडी – अवताडे (८३३ मतांनी)



आठवी फेरी

समाधान अवताडे – ३ हजार २८७ (एकूण मतं – २३ हजार ५००)

भगीरथ भालके – १ हजार ९५४ (एकूण मतं – २१ हजार ३३४)

आघाडी – अवताडे (२ हजारांहून अधिक मतांनी)



नववी फेरी

समाधान अवताडे – २ हजार ७५५ (एकूण मतं – २६ हजार २५५)

भगीरथ भालके – २ हजार ६९३ (एकूण मतं – २४ हजार २७)

आघाडी – अवताडे (२ हजार २०० हून अधिक मतांनी)



दहावी फेरी

समाधान अवताडे – २ हजार ५२१ (एकूण मतं – २८ हजार ७७६)

भगीरथ भालके – ३ हजार १०६ (एकूण मतं – २७ हजार १३३)

आघाडी – अवताडे (१ हजार ६०० हून अधिक मतांनी)


टिप्पण्या