Murder case: किसनराव हुंडीवाले हत्याकांड: मुख्य आरोपी श्रीराम गावंडेची कोरोनातून मुक्तता; तर कोर्टात तात्पुरता जामीन नामंजूर, दिनेश राजपुतची अकोला हद्दीत येण्याची अट शिथिल

                                प्रतिकात्मक चित्र




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला :  बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरण न्यायप्रविष्ट असून,  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपी दिनेश बादलसिंग राजपूत याची अकोला महानगरपालिका हद्दीत प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत न येणे, ही अट शिथिल केली. तर मुख्य आरोपी श्रीराम गावंडे कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांनी केलेला तात्पुरता जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.



या प्रकरणात पोलिसांनी श्रीराम गावंडे आणि इतर लोकांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये चार आरोपी हे अजूनपर्यंत अकोला कारागृह मध्ये आहेत. चौघांनाही अद्याप जामीन मिळाला नाही.



दरम्यान, यातील आरोपी दिनेश बादल सिंग राजपूत याला 13 डिसेंबर 2019 मध्ये उच्च न्यायालय नागपूर येथून भरपूर अटींसह जामीन मिळाला होता. त्यामध्ये प्रकरणाचा निकाल होईपर्यंत अकोला महानगर पालिकेच्या हद्दीत मध्ये प्रवेश बंदी अशी एक अट होती. आरोपीच्या वतीने  वकील अजय लोंढे यांनी विद्यमान उच्च न्यायालय नागपूर येथे अट शिथिलते करिता अर्ज दिला होता. त्यावर  दूरदृश्य प्रणाली द्वारा सुनावणी होवून सरकार पक्षाने खूप विरोध केला. तर "जामीन मिळून भरपूर महिने झाले असून अजून पर्यंत हे प्रकरण बोर्डावर आले नाही. आरोपी हा कुठपर्यंत बाहेर राहणार. तसेच आरोपी हा त्याचा आईचा सांभाळ करणारा पुरुष आहे", असा युक्तिवाद अजय लोंढे यांनी आरोपीची बाजू मांडत केला.   





उच्च न्यायालय नागपूर यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकली.त्यानंतर बुधवार 5 मे रोजी आरोपी दिनेश बादल सिंग राजपूत याची अकोला महानगरपालिका हद्दीत  प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत न येणे, ही अट शिथिल केली. याआधी मयुर अहिर या आरोपीची अट शिथिलचा अर्ज नागपूर येथील वकिलांनी केला होता. मात्र, विद्यमान न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला.




या प्रकरणात मुख्य आरोपी श्रीराम गावंडे याला कोरोना झाल्याने त्यावर तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयात   केला होता. पण आरोपी श्रीराम गावंडे कोरोना आजारातून बरा झाल्याने त्याचा तात्पुरता जामीन अर्ज नामंजूर झाला असल्याची माहिती  वकील लोंढे यांनी दिली.





टिप्पण्या