Inspirational: Ramadan Special: फ्लाईंग कलर्स फाउंडेशनने भरला गरजूंच्या जीवनात रंग; लॉकडाउन मध्ये रोटी, कपडा बँक सोबतच वैद्यकीय मदत अन दिला बेरोजगारांना रोजगार

                 ओळख संस्थेची

Inspirational: Ramadan Special: Flying Colors Foundation Fills Colors in the Lives of the Needy;  In the lockdown, bread, clothes, bank as well as medical aid and work given to the unemployed






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: गत पाच वर्षापासून सामाजिक कार्यात जुळलेली शहरातील एक संस्था. फ्लाईंग कलर्स एज्युकेशन फाउंडेशन. कोरोना विषाणू संकटात देखील या संस्थेने अनेक गरजूंच्या जीवनात रंग भरला आहे.  गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ही संस्था सदैव तत्पर असते, याची प्रचिती अनेकांना कोरोना संकट काळात आली.





या संस्थेने आपल्या सामाजिक कार्यास रोटी बँक ही अभिनव संकल्पना राबवून केली होती. पाहता पाहता या अभिनव उपक्रमाची सर्वदूर चर्चा होवून ही संस्था अभिनंदनास पात्र ठरली. आता या रोटी बँकेकडून दवाखाने व गरीब लोकांच्या वस्ती मध्ये खाण्या पिण्याच्या आणि राशनचे वितरण करीत आहे. दुसरीकडे कपडा बँक मधून आवश्यक कपडे आणि चप्पल देखील वितरीत करण्यात येत आहे. तसेच गरजू लोकांच्या आरोग्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित आहे, विशेष म्हणजे ही सर्व मदत गरीब आणि गरजू लोकांना निःशुल्क देण्यात येते.





फाउंडेशन द्वारा गरजू पिडीत रुग्णांना मेडिकल सहाय्यता केंद्र येथून देखील नि:शुल्क मदत देण्यात येत आहेत.कोरोना विषाणू संकट काळात रोजगार गमावलेले लोकांना फाउंडेशनच्या एका रोजगाराच्या मोहिम अंतर्गत हातगाड्या, सिलाई मशीन, सायकल रिक्षा किंवा कोणत्याही सामानाची गरज असल्यास त्यांना दिली जात आहे. बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या मोहिम कार्यान्वित केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये १५ लोकांना संस्थेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.





लाखो लोकांना जेवण

संस्थेचे अध्यक्ष डॉ. जुबेर नदीम यांनी सांगितले की, एका वर्षात लॉकडाऊन दरम्यान सुमारे दोन लाख (२००,०००) व्यक्तींना जेवण पोहचविले आहे. तर ११०० कुटुंबात राशन किट्स वितरित केल्या  आहेत. यावर्षी रमजान मध्ये ६०० च्या वर कुटुंबीयांना राशन किट्स पोहोचण्याचे काम संस्थेने केले असून, अजूनही अविरत सुरू आहे.




अशाच प्रकारे कपडा बँकेने १००० अधिक जोडे, कपडे आणि ४०० गरम कपडे स्वेटर दिले आहेत. या लॉकडाउन मध्ये मेडिकल सहाय्यता केंद्र द्वारा ८ रूग्णांच्या मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले. तसेच ४ रुग्णांचे मोठे ऑपरेशन नि:शुल्क करण्यात आले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त असलेल्या ५०० पेक्षा जास्त रुग्णांना विविध दवाखान्यामध्ये १.५ लाख रुपयांचा कन्सेशन प्राप्त करून दिले आहे,असे देखील डॉ. नदीम यांनी सांगितले.

  



या सामाजिक कार्यामध्ये संस्था अध्यक्ष डॉ जुबेर नदीम यांच्यासह डॉक्टर मुजाहिद अहमद, रियाज खान, अब्दुल रहिम , रिजवान खान, राहील अफसर, सय्यद मोहसीन अली, समीर खान, उबेद शेख, रियाज अहमद, डॉक्टर सरोष खान, उबैदुल्लाह खान आणि आदिल अशर अहोरात्र झटत आहेत.

टिप्पण्या