Devendra fadnavis:अकोल्यासाठी CSR फंडातून 140 जंबो सिलेंडरचा ऑक्सिजन प्लांट देण्याची देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा




अकोला: जिल्हा करिता 140 जम्बो सिलेंडरचा ऑक्सीजन प्लांट CSR फंडातून देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज केली त्यांनी मेडिकल कॉलेज येथील पाहणी केल्यानंतर तसेच लोकप्रतिनिधीं सोबत चर्चा केल्यानंतर ताबडतोब त्यांनी 140 जम्बो सिलेंडरच्या ऑक्सीजन प्लांट देण्याची घोषणा केली आहे.



आज भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व लोकप्रतिनिधी सोबत त्यांनी पाहणी केल्यानंतर ही घोषणा केली. तसेच अकोला मधील  रुग्णालयात असलेल्या अडचणी संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची हमी दिली. याशिवाय  अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये भरती प्रक्रिया मध्ये वाढ करण्यासंदर्भात सुद्धा मागणी केली.




अकोला मेडिकल कॉलेजमध्ये एक महिन्यापासून ऑक्सिजन बेड तयार असून पण जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन सुरू करत नाही. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे व्हेंटिलेटर आहे. परंतु टेक्निशियन नसल्यामुळे अडी अडचण येत आहे. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी टेक्निशियन उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात केली आहे. लसीकरण केंद्रावर व्यवस्थापन आणि नियोजन नाही, यासंदर्भात फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन चर्चा केली आणि योग्य व्यवस्था करावी,असे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या मतांचा आदर करावा,अशी सूचना देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या