covid help:Blood Donation: सामाजिक बांधिलकी जपत शिवाजी इंजिनीरिंग कॉलेज व युथ होस्टेल तर्फे महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबीर ;३७ रक्तदात्यांनी केले रक्तदान






Blood Donation Camp on Maharashtra Day by Shivaji Engineering College and Youth Hostel with Social Commitment; Blood Donation by 37 Blood Donors




अकोला: कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत तरुणाईत प्रचंड उत्सुकता असून करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. रक्तदानासाठी साधारणपणे तरुणाईवर रक्तपेढ्या अवलंबून असतात. त्यांचे लसीकरण झाल्यावर रक्त संकलानावर परिणाम होणार असल्याने लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित शिवाजी इंजिनीरिंग कॉलेज, अकोला तर्फे प्राचार्य डॉ सतीश देशमुख व युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, अकोला चे प्रमुख  शरद भागवत यांनी केले सामाजिक माध्यमांद्वारे केले होते. 





या आवाहनाला प्रतिसाद देत ऍडव्होकेट भूषण भागवत, प्रा. मंदार देशमुख, समीर होरे, सौरभ बावणे, अक्षय जोशी, ओंकार कपले, गणेश पातुरकर, स्वप्नील साठे, निरज शहा, संदीप  कृपाल, संदीप देसाई, दीपक झापर्डे, राहुल डोमकुलवार, राहुल गोरले, प्रा. अमित गावंडे, दीपक शर्मा, हितेश आनंदानी, आकाश कंडारकार, आकाश बोबडे, आदित्य फोकमारे, अजय जेठाणी, सुरत जेठाणी, ऍडव्होकेट विदिश साखरकर, प्रा. आनंद बिहाडे,स्वप्निल भगत, परिमल भवाने,  ज्योती भवाने, स्वप्नील काळे, खेमराज भटकर आदींनी असे एकूण ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 




महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी परिमल भवाने याला रक्तदान करण्यासाठी सोबत घेऊन आलेल्या ज्योती भवाने या त्याच्या मातेने सुध्दा स्वतःही रक्तदान करून हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याच्या जागतिक संदेशाची कृतीतून उजळणी केली. या मायलेकांनी सोबत केलेले रक्तदान हे या शिबिराचे वैशिष्ट ठरले . 




 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित शिवाजी इंजिनीरिंग कॉलेज, अकोला व युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाला १ मे  रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत रक्त दान शिबिराचे आयोजन हेडगेवार रक्तपेढी येथे केले होते.





उपक्रम यशस्वी करण्यासाठी युथ होस्टेल अकोला अध्यक्ष दिलीप काळे, सचिव विलास पाटील, उपाध्यक्ष संदीप सरडे, डॉ. संदीप साखरे, विजय औतकार, श्रद्धानंद बिहाडे, प्रा.संजय नाईकवाड, दिवाकर पाटील, प्रा. नरेंद्र बुजरूक, प्रा. मंगेश शेगोकार, प्रा. शशिकांत ठाकरे, प्रा. आदित्य गणगणे तसेच दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी मंडळाच्या रुग्णवाहिकेसह उपक्रमात भाग घेऊन सहकार्य केले. सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या