corona virus in Akola: धक्कादायक: आज दिवसभरात 27 जणांच्या मृत्यूची नोंद, 523 नवे पॉझिटीव्ह, 461 जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. 15 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-1264*
*पॉझिटीव्ह-343*
*निगेटीव्ह-921*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 343+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 180= एकूण पॉझिटीव्ह- 523



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 343 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 151 महिला व 192 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-26, अकोट-16, बाळापूर-12, तेल्हारा-59, बार्शी टाकळी-54, पातूर-47, अकोला-129. (अकोला ग्रामीण-34, अकोला मनपा क्षेत्र-95)


आज दिवसभरात 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कुटसा येथील 80 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पातूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजार ता.अकोट येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 26 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते,  देवारी ता.अकोट येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर हिंगणा ता. बाळापूर येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. उगवा येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. रामदासपेठ येथील 87 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 5 रोजी  दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 53 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, शरीफ नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, वल्लभ नगर येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच उरळ ता. बाळापूर येथील 57 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11रोजी दाखल करण्यात आले होते, धानोरा ता.मुर्तिजापूर येथील 63 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसपूर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, पानज ता.अकोट येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 52 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालय येथे तिघांचे मृत्यू झाले. त्यात मुर्तिजापूर येथील 40 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 85 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 22, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, लोहाणा हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, मुलीचे वसतीगृह अकोट येथील 15, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 461 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-37776+11782+177= 49735*
*मयत-891*
*डिस्चार्ज-42024*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6820*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या