Break the chain: Akola: 'ब्रेक द चेन ‘ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर



अकोला : 'ब्रेक द चेेेन' या आदेशानुसार, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ११ वाजे पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी ११ वाजे पर्यत सुरु राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हाटसअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत. तसेच सर्वथा बँका मधिल कामकाज पुर्वी प्रमाणेच सर्व ग्राहकांसाठी निर्धारित ९ ते १ वेळेत सुरू राहणार आहे.




हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी ७ ते सकाळी १२ वाजे दरम्यान करता येईल.




सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. या जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील.तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत सुरु राहील. पशुसंवर्धन अधिका-यांनी त्याचे संनियंत्रण करण्याचे आदेश आहेत.




 हे राहणार संपूर्ण बंद

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण व परीक्षा घेण्यास प्रतिबंध नाही. मात्र त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिका-यांवर आहे.



टिप्पण्या