Amravati University: exams postponed: अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षा स्थगित; अभियांत्रिकी व तांत्रिकी, विधी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा यातून वगळले

                                      file photo



Amravati University's winter 2020 exams postponed;  Excluded from examinations in Engineering and Technology, Law, Pharmacy courses





अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने १२ मेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी २०२० च्या परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मात्र, अभियांत्रिकी व तांत्रिकी, विधी, फार्मसी या अभ्यासक्रमांच्या परीक्षा यातून वगळण्यात आल्या आहेत.






कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मेच्या पत्रानुसार अमरावती जिल्ह्याकरिता ९ मेचे दुपारी १२ पासून १५ मेचे रात्री १२ पर्यंत संचारबंदी व प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. दरम्यान, अकोला,वाशिम व अन्य जिल्ह्यात देखील lockdown घोषित केले आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे गैरसोयीचे होणार होते. यामुळे विद्यार्थी वर्गाचा विचार करून विद्यापीठाने ८ मे रोजी परीक्षा स्थगितीचे परिपत्रक काढले असून, ते संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविले आहे.





विद्यापीठाच्यावतीने परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.


टिप्पण्या