Weather Forecast: अकोला: येत्या दोन ते तीन दिवस विदर्भात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता

                                      संग्रहित चित्र Weather Forecast: Akola: Chance of thundershowers with thunderstorms in next two to three days




भारतीय अलंकार 24

अकोला,दि. ९: भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार  ९ ते १२ एप्रिल दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वीज पडणे, गारपीट,  हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


अकोला जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवस गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 


जमिनीपासून साधारण तीन कि.मी.वर सक्रिय चक्राकार वारे, तापमानात  घट आणि निरंतर वाढणारी आर्द्रता. या बदलामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती सुरू झाली असून, अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे.


हवामान विभागाने अकोला व विदर्भातील इतर ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाचे संकेत दिले आहेत.



टिप्पण्या