Superstar Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; पुरस्कार वितरण ३ मे रोजी होणार

                                      File photo



भारतीय अलंकार 24

नवी दिल्ली: गरागरा पाय फिरवून वावटळ उठवणारा, उडवत सिगारेट सुलगवणे, गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकविणे, गॉगल घालण्याची अनोखी रीत अश्या जगावेगळ्या स्टाइलने अभिनेता रजनीकांत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर चढविले. आजही त्याची ही अफाट लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आज त्यांना अत्यंत प्रतिष्ठतेचा मानला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे.




अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केली. दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.


देशातील सर्व भागांतील चित्रपट निर्माते, अभिनेता, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार महान नायक रजनीकांत यांनी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली ५ दशके चित्रपटसृष्टीवर निर्विवाद राज करत आहेत. ते लोकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळे यावेळेचा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.


आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाच ज्युरींनी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली होती,हे येथे उल्लेखनीय आहे.



शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत 
                                      file photo

शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांनी तमिळ सोबत हिंदी चित्रपटांतून अफाट लोकप्रियता मिळविली आहे. त्‍यांचा जन्‍म १२ डिसेंबर, १९५० या दिवशी बंगळूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. १९७७ साली तेलुगु चित्रपट 'शिलगम्‍मा चेंपिडी' मध्ये रजनीकांत यांना पहिल्यांदा मुख्य भूमिका मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. यानंतर १९७८ साली प्रदर्शित भैरवी या चित्रपटाने रजनीकांत यांना सुपरस्टार अशी ओळख मिळवून दिली. १९८० साली डॉनचा रिमेक आल्यानंतर रजनीकांत यांना साऊथचा अमिताभ अशी ओळख मिळाली. 

टिप्पण्या