Remedesivir smuggling: विशेष बातमी: रेमडेसीवीर इंजेक्शनची काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची कामगिरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कामगिरी 




Akola police have busted a gang involved in the smuggling of Remedesivir injections





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसोबत उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणारी रेमडीसीविरची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत अवघ्या राज्यात  इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. अकोल्यातही मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले. अकोला पोलिसांनी पाळत ठेवून आज एका टोळीला ताब्यात घेतले आहे. 



स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली आहे. शहरातील एका मेडिकलवर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रेमडीसीविरचा काळाबाजार करणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी रेमडीसीविरचे ३ इंजेक्शन जप्त केले आहे. कोणत्याही प्रकारची  परवानगी नसतांना ही टोळी रुग्णांना ज्यादा भावाने  हे इंजेक्शन विकत असल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तींकडून मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.



काळा बाजार 

शहरात रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी झाल्याने काळाबाजारी वाढली असल्याचे देखील बोलले जात आहे. या साखळीने परवानगी नसतांना हे इंजेक्शन आणले कुठून ? ज्याने या टोळीला हे इंजेक्शन पुरवले त्याने कोणत्या आधारावर हे इंजेक्शन या टोळीला दिले ? यामध्ये कोविड रुग्णालय तर सामील नाही ना याचा तपास आता पोलीस करत असल्याचे मोनिका राऊत ,अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.


टिप्पण्या