- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Parambir Singh: 100 कोटी: राज्यात पुन्हा खळबळ: परमबीर सिंह यांनी केला हजारो कोटींचा भ्रष्टाचार; भीमराव घाडगे यांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री यांना पाठविले 14 पानी पत्र
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*परमबिर सिंग यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेनाम संपत्ती
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्यात १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत पोलीस आयुक्त म्हणून पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून मनमानी कारभार करीत गुन्हेगारांना पाठबळ देऊन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप पोलीस अधिकारी भीमराज ऊर्फ भीमराव घाडगे यांनी केला आहे. यासंदर्भातील पत्र घाडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि एसीबीला पाठविले आहे.
परमबीर सिंह यांची बदली
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थान बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन आढळल्याचे प्रकरण योग्य रीतीने हाताळले नसल्याचे कारण देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७ मार्च रोजी परमबीर सिंह यांची बदली केली हाती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे कथित उद्दिष्ट दिल्याचा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला. यानंतर या प्रकरणात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आता मात्र,परमबीर सिंह यांच्यावर त्यांच्या खात्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत,या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागात पाठविले आहे.
पोलीस निरीक्षक भीमराव आर घाडगे
अकोल्याच्या नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराव आर घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 20 एप्रिलला त्यांनी 14 पानाचा एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
परमबिर सिंह हे ठाणे शहर पोलिस आयुक्त असतांना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी फ्रांसिस डिसिल्वा व प्रशांत पाटिल या पोलिस कर्मचाऱ्यांना 20 वर्षांपासून त्यांच्या कामासाठी सोबत ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी यामध्ये केला. या दोन्ही कर्मचाऱ्यांना परमबिर सिंग यांची बेनाम संपत्ती कुठे आहे हे संपूर्ण माहिती असल्याचेही पत्रात उल्लेख करण्यात आले आहे.
परमबिर सिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेनाम संपत्ती म्हणजे 21 एकर शेत दुसऱ्या नावाने खरेदी केली असल्याचे पत्रात लिहलं आहे. याआधी पोलीस निरीक्षक घाडगे यांनी परमबीर विरुद्ध तक्रार 2015 आणि 2016 यावर्षी सुद्धा केली होती.
परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या डीसीपी कडून प्रत्येकी 40 तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी 20 ते 30 तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून सुमारे 30 ते 40 तोळ्यांची सोन्याची बिस्किटे घेतली आहेत, असा गौप्यस्फोट घाडगे यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. तसेच पोलीस उप आयुक्त पराग मणेरे यांचा देखील यामध्ये सहभाग होता, असेही घाडगे यांनी पत्रात म्हटले आहे.
भीमराव घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे. घाडगे सध्या अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि त्यांच्या सहकार्यांनी 2015-16 मध्ये real- estate developers बिल्डर्स कड़ून करोडो रुपये खाऊन सर्व केसेस बंद केल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक घाडगे यांना निलंबित केले होते. त्यांच्या पत्नीलाही अटक केली गेली होती. घाडगे यांनी न्यायाकरिता सर्व दरवाजे ठोठावले होते. मात्र, आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते बिल्डर लाॅबीचे असतात की इमानदार पोलिसांचे की भ्रष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांची पाठराखण करणारे, असा सणसणीत प्रश्न घाडगे यांनी केला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा