Lockdown: break the chain: अत्यावश्यक सेवा, आस्थापना, कार्यालयांसाठी सुधारित वेळा निश्चित-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



 




अकोला, दि.२०: अकोला जिल्ह्यातील  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याचे  दृष्‍टीने  याआधीच्या निर्बंधांबाबतच्या आदेशामधील अत्यावश्यक बाबीतील आस्थापना/ कार्यालय यांच्या करीता खालील प्रमाणे वेळा निश्चीत करण्यात आल्य,असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.




या मार्गदर्शक सूचना मंगळवार २०एप्रिल च्या रात्री आठ वाजेपासून अंमलात येतील.  निश्चित करण्‍यात आलेल्‍या वेळा या व्यक्ती तसेच संस्थांसाठी लागू राहतील,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  






निश्चित करण्‍यात आलेली  वेळ


१ किराणा दुकाने


सकाळी ७.०० ते ११.००


२ भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने       ( द्वार वितरण वगळता)


सकाळी ७.०० ते ११.००


३ दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री ( डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी ) (घरपोच  दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील.)


सकाळी ७.०० ते ११.००


सायंकाळी ५.०० ते ७.००


४ सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्‍ट्री फार्म, मासे आणि अंडी सह)


सकाळी ७.०० ते ११.००


६ शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने.


सकाळी ७.०० ते ११.००


७ पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने


सकाळी ७.०० ते ११.००


८ पावसाळी हंगाम सामग्री  संबंधित दुकाने


सकाळी ७.०० ते ११.००



९ सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका,  बिगर बॅंकींग वित्‍तीय संस्‍था, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था,  विमा , पोस्‍ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तीय संस्था. (अत्‍यंत महत्‍वाचे / तातडीचे व्‍यवहाराकरिता)


सकाळी ९.०० ते १.००



१० पेट्रोल पंप खाजगी वाहनांकरिता (पेट्रोल, डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री


सकाळी ७.०० ते ११.००




११ पेट्रोलपंप शासकीय/ मालवाहतूक, अॅम्‍ब्‍युलंन्‍स   वाहनांकरिता    (पेट्रोल , डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री

नियमित वेळेनुसार



१२ बॅटरी, इन्‍हर्टर ,युपीएस साहीत्‍याची  दुकाने


आवश्‍यकता भासल्‍यास रुग्‍णालये,  कोविड हॉस्‍पीटल, आयसीयु, क्रिटीकल सेंटर इत्‍यादी अत्‍यावश्‍यक ठिकाणी  सामुग्री व तदनुषांगीक साहीत्‍य केवळ उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी उघडता येईल. ( इतर कोणत्‍याही परिस्थितीत  संबंधीत दुकानदार , विक्रेते यांना दुकान उघडून मालाची  विक्री करता येणार नाही.)            


 


वरील प्रमाणे नमूद केलेली अत्यावश्यक सेवेतील आस्थापना/कार्यालय/दुकाने यांना कोविड-19 विषयक मार्गदर्शक सुचनेचे  तसेच निर्गमीत केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे सर्व पालन करणे बंधनकारक राहील.




हे आदेश अकोला  जिल्ह्यात मंगळवार दि. २० रोजी रात्री आठ पासून ते दि.१ मे चे सकाळी सात वाजेपर्यत लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्‍हा पोलीस अधीक्षक अकोला , आयुक्‍त, अकोला महानगरपालिका अकोला तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असेल. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या