Jagdish lad: bodybuilder: मिस्टर इंडिया विजेता महाराष्ट्र श्री जगदीश लाड याचे कोरोनाने निधन

Jagdish lad: bodybuilder: Mr. India winner Maharashtra Mr. Jagdish Lad passed away by corona (file photo)



मुंबई: मराठमोळा शरीरसौष्ठवपटू महाराष्ट्र श्री व मिस्टर इंडिया खिताब विजेता जगदीश लाड याचे कोरोनाने निधन झाले. तो अवघ्या ३४ वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने शरीरसौष्ठव वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मुळचा कुडाळ सिंधुदुर्ग आणि सध्या नवी मुंबईत स्थिरावलेला एक उत्कृष्ट असा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड. जगदीशने 'महाराष्ट्र श्री' स्पर्धेत चार वेळा सुवर्ण कामगिरी केली तर, मिस्टर इंडिया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने दोन वेळा सुवर्णपदक मिळवले.  जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य आणि कांस्यपदक आपल्या नावे केले. कमी वयातचे त्याने शरीरसौष्ठव क्षेत्रात चांगले नाव कमवले. त्याने नवी मुंबई महापौर श्री स्पर्धेचा किताब देखील मिळविला होता. जगदीशने बडोदा येथे स्वतःची जिम सुरू केली होती. त्यासाठी तो काही दिवस पूर्वी बडोद्याला स्थायिक झाला होता. तिथे त्याचे देहावसान झाल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी प्रसार माध्यमांना दिली. 




जगदिशच्या चाहत्यांनी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी आज समाज माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उत्तम शरीरयष्टी असणारा आणि शरीर स्वास्थ्य जोपासणारा जगदीशच्या अकाली निधनाने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





टिप्पण्या