Income Tax:PAN: नागरिकांना दिलासा: आता 30 जून पर्यंत पॅनशी आधार क्रमांक जोडता येणार…

                                    file image



भारतीय अलंकार 24

नवी दिल्ली: कोविड -19 (साथीचा रोग)  देशभर पसरला आहे. यामुळे उद्भवणारी अडचणी लक्षात घेता, केंद्र सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 ते 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे,याबाबतची माहिती भारत सरकार आयकर विभागाने बुधवारी सायंकाळी दिली.



Central Government extends the last date for linking of Aadhaar number with PAN from 31st March, 2021 to 30th June, 2021, in view of the difficulties arising out of the COVID-19 pandemic



आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 148  अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (डीआरपी) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारण्या संबंधीच्या निवेदनांवर प्रक्रिया करणे देखील 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आले.




Date for issue of notice under section 148 of Income-tax Act,1961, passing of consequential order for direction issued by the Dispute Resolution Panel (DRP) & processing of equalisation levy statements also extended to 30th April, 2021.




पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी बुधवार 31 मार्च  शेवटचा दिवस होता. कोविड19 परिस्थितीमुळे तर काहींनी चालढकल केल्यामुळे शेवटच्या दिवशी पॅनला आधार लिंक करण्यासाठी सरसावले. ज्यांनी शेवटचा दिवस उजाडला तरी देखील पॅन आणि आधार लिंक केले नाही,अश्या लोकांनी आयकर विभागाच्या साईटवर उड्या मारल्या. ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर पॅन कार्ड वापरा संदर्भातील काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो,अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली होती. मात्र अनेकांनी एकाच वेळी यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने बुधवारी दुपार पासून साईट क्रॅश झाली असल्याचे अनेकांनी यासंदर्भात समाज माध्यमातून विशेषतः ट्विटरवर तक्रारी केल्या. पॅन आणि आधार कार्ड हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेंड झाले.



साईट बंद असल्याच्या तक्रारी

पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण येत असल्याचे, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीन शॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसे करायचे असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारून रोष व्यक्त केला. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डल सोबत अनेकांनी युआयडी (आधार) च्या ट्विटर हॅण्डलला टॅग करूनही हे प्रश्न विचारले.



अखेर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास इनकम टॅक्स इंडिया ने ट्विट करीत तारीख वाढविल्या बाबत माहिती देत, नागरिकांना दिलासा दिला.






टिप्पण्या