Health Akola: श्रीराम नवमी शोभायात्रा समिती तर्फे विवेक दालमिया स्मृतीप्रित्यर्थ मेन हॉस्पिटलला जीवनदायिनी यंत्र प्रदान




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: असंघटित कामगार आणि व्यापार्‍यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करणाऱ्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे सचिव विवेक दालमिया covid-19 या आजाराने ग्रस्त होऊन यात त्यांचे निधन झाले. कोरोना योद्धा व समाजासाठी संघर्षशील विवेक यांच्या स्मृतीत श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने स्थानिक अकोला मेडिकल कॉलेज द्वारा संचालित मेन हॉस्पिटलला शिरीन मशीन प्रदान करण्यात आली.




अतिदक्षता कक्षामध्ये राहणार्‍या रुग्णांना उपयोगी पडणारी ही भेटवस्तू जीवन दायिनी ठरणार आहे. समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, अध्यक्ष विलास अनासने, उद्योजक शिवप्रकाश    रूहटिया, डॉक्टर अभय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला मेडिकल कॉलेजच्या प्रमुख मीनाक्षी गजभिये यांच्या सुपूर्द करण्यात आले. 




अकोला रामनवमी शोभायात्रा समितीचे कोषाध्यक्ष अशोक गुप्ता यांचे जावई व समितीचे पदाधिकारी अशोक दालमिया यांचे सुपुत्र विवेक दालमिया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतीमध्ये समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने सर्वसामान्य नागरिकांना व असंघटित कामगारांना व व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षशील राहणारे अकोला लिस्ट इंडस्ट्रीचे माजी सचिव तसेच टेक्नॉलॉजी मध्ये अग्रेसर, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना अकोल्यात आणणारे व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स त्या माध्यमातून व्यापाऱ्यांसाठी न्याय मिळून देण्यासाठी तसेच फेरीवाले व्यापारी छोटे उद्योजक छोटे दुकानदारांच्या प्रश्नासाठी संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे धनी कुशल उद्योजक मिलनसार धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर विवेक दालमिया यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे.  विवेक दालमिया यांची स्मृती  कायम राहावे, रुग्णांना चांगली सेवा प्रदान व्हावी, यासाठी अकोला मेडिकल कॉलेजमध्ये अतिदक्षता विभागात उपचाराला उपयोगी मशिनरी प्रदान करण्यात आली,अशी माहिती याप्रसंगी गिरीश जोशी यांनी दिली.





यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, विलास अनासने, शिवप्रकाश रूहटिया, डॉक्टर अभय जैन, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, मनीष बाछुका, नवीन गुप्ता, अतुल शर्मा, जयंत मसने, गिरीश गोखले, नितीन जोशी, पुष्पा वानखडे तसेच डॉक्टर नेताम डॉक्टर सिरसाम, गोकुळ पोतले, प्रवीण मानकर, संतोष पांडे, संदीप वाणी, अनिल मानधने, राम ठाकूर, मोहन गुप्ता, शंकर खोवाल, बाळकृष्ण बिडवई, अजय शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या