*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. २८ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- २००७*
*पॉझिटीव्ह-२६९*
*निगेटीव्ह-१७३८*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २६९+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १३९= एकूण पॉझिटीव्ह-४०८
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात २६९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १०९ महिला व १६० पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-दोन, अकोट-१०, बाळापूर-२५, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-६३, पातूर-२८, अकोला-१३६. (अकोला ग्रामीण-२६, अकोला मनपा क्षेत्र-११०)
आज दिवसभरात १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य जूने शहर येथील ६८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, येलवन ता. बार्शीटाकळी येथील २९ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, गौतम नगर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. बेलुरा उमरा ता.अकोट येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते,चोहट्टा बाजार ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच केशव नगर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, एमआयडीसी नं.४ शिवणी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पाच जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात उमरी ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष असून त्याना दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य कोळंबी ता. मुर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर येथील २९ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील ६० वर्षीय पुरुष असून त्याना दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, शास्त्री नगर येथील ७८ वर्षीय महिला असून त्याना दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील ११, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, यकीन हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, देवसार हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६१५ असे एकूण ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३०२५५+८५१९+१७७= ३८९५१*
*मयत-६६८*
*डिस्चार्ज-३३२६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५०२०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा