Court news: अपहरण - ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपीला जामीन ;अल्पवयीन मुलीला पळविल्याचा आरोप, मूर्तिजापूर येथील घटना

                                      file photo



भारतीय अलंकार 24

अकोला: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मोटरसायकल वरून पळून नेल्या नंतर दीड महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी काही अटीवर जामीन मंजूर केला.



मूर्तिजापूरच्या पुंडलिक नगर येथील एका अल्पवयीन मुलीचे 26 जानेवारी 2021 रोजी अपहरण करण्यात आले होते.  मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुर्तीजापुर शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विक्की राजू भोसले (रा. देवनगर, दिग्रस जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध  भा दं वि 363, 366 ( अ ) तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3, (2) (va) नुसार गुन्हा दाखल केला होता. 



आरोपी पुंडलिक नगरात भाड्याने खोली करुन राहत होता. या आरोपीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविले, असा आरोप होता. पोलिसांनी दीड महिना आरोपीचा शोध घेतला. अखेर 17 मार्च 2019 रोजी दिग्रस येथून पोलिसांनी प्रेमीयुगुलास  ताब्यात घेतले. या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष पाटील यांनी तपास केला.



प्रेमप्रकरणातून संमतीने हे प्रकरण घडले,  तसेच या गुन्ह्यात आरोपीने अनुसूचित जाती जमाती कायद्याचे कोणतेही उल्लंघन केले नाही,असा आरोपीच्या वकिलाचा बचाव होता. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील आणि फिर्यादी (पीडित मुलीची  आई ) यांनी न्यायालयात हजर राहून जामीन देण्यास विरोध केला. उभयतांच्या युक्तिवाद नंतर आरोपीला काही अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड नरेंद्र बेलसरे, ॲड एम. एस. वाकोडे यांनी काम पाहिले. तर सरकारची बाजू ॲड किरण खोत यांनी मांडली.

टिप्पण्या