- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Court news: fake appointment: बनावट नियुक्ती पत्रे देवून ९ लाख ६० हजाराने फसवणूक ; दर्यापूरच्या डॉ.बानुबाकोडे याला २६ पर्यंत पिसीआर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिष दाखवून त्यांना बनावट नियुक्ती पत्रे दिल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी दिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, दर्यापूर येथील डॉ. श्रीकांत मंगेश बानुबाकोडे (32) व देवानंद रमेश अनासने (29 ) रा. मानेवाडा रोड नागपूर या दोघांनी अकोला लहान उमरी येथील अनुप ज्ञानेश्वर पिंजरकर यांच्यासह अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डॉ. बानुबाकोडे व त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट शिक्के तयार करून तरुणांना बँकेत रुजू होण्याबाबत नियुक्तीपत्रे दिली. रुजू होण्यासाठी गेल्यानंतर तरुणांच्या हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.
याबाबत अनुप पिंजरकर यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार भा दं वि 420, 406, 468 471 (34) नुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी देवानंद अनासाने याला नागपूर येथून तर डॉ. श्रीकांत बानूबाकोडे याला दर्यापूर येथून अटक केली. या दोघांनी अनेक तरुणांना तलाठी, वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसा वसूल केला, अशी माहिती रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयात दिली.
नऊ लाख साठ हजाराचा हा घोटाळा असून तपासात अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो, त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे व तपास अधिकारी पीएसआय संदीप मडावी यांनी न्यायालयात केली होती.
या प्रकरणात डॉ. तिरपुडे यांच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट लेटरहेडवर तयार केलेले असल्यामुळे डॉ. तिरपुडे यांची चौकशी करणे, तसेच अपॉइंटमेंट लेटर कोठे आणि कोणी तयार केले ? तसेच या खटल्यातील फिर्यादी व इतर लोकांकडून वसूल केलेली रक्कम कुठे वापरली ? याबाबत तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. याच मुद्द्यावरून न्यायालयाने आरोपींना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा