Coronavirus in Akola: अकोल्यातील औषधी विक्रेताने दिला माणुसकीचा परिचय; मंत्रालयातही झाली चर्चा

        Monday Motivation


*इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना धडा...



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना सोबतच कोरोनावर उपचारासाठी उपयोगी समजल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी सुद्धा वाढली आहे. अनेक जिल्ह्यात या इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या जात आहे तर, काही ठिकाणी याचा काळाबाजार करून रुग्णांची लूट केली जात आहे. मात्र, अकोल्यातील एका औषध दुकानदाराने माणुसकी जपत हे इंजेक्शन ' ना तोटा ना नफा' तत्वावर उपलब्ध करून देवून माणुसकीचा परिचय दिला.




अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने वाढू लागली आहे..या सोबतच रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी देखील वाढली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मर्यादित असल्यामुळे अनेक रुग्णालय रुग्णाच्या नातेवाईकांना औषधांच्या दुकानांतून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगतात.  मात्र, योग्य पुरवठा असूनही अनेक औषध दुकाने तसेच रुग्णालयात त्याचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचे राज्यात चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने याची किंमत मर्यादित करण्याची घोषणा केली. मर्यादित किमतीत विकण्याचे निर्देश दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन बाजारात तब्बल पाच ते दहा हजारांपर्यंत विकले जात आहे. मात्र, अकोल्यातील सिव्हिल लाईन येथील औषधी विक्री दुकानात ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णांची कोणतीही लूट न करता कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता हे इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.



"सामाजिक दायित्व म्हणून  रेमडेसिवीर इंजेक्शन हेआम्ही (1475 ₹) 'ना तोटा ना नफा' या तत्वावर विकत आहोत."

भुपेश मुंदडा, 

दुकान मालक




वाढत्या किमतीत हे इंजेक्शन विकल्या जाण्याने याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. दत्त मेडिकल दुकानाचे संचालक कोरोना बाधित झाले; आणि त्यांनी उपचार दरम्यान रेमडीसीविर इंजेक्शनसाठी होणारी रुग्णांची लूट पाहिली. रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहून, आपल्या दुकानावर हे इंजेक्शन कोणताही फायदा न घेता विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाची चर्चा मंत्रालयात सुद्धा झाली. कोविड-19 च्या सुरुवातीच्या काळात तर चार हजारांच्या या इंजेक्शनसाठी १६ ते ४० हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, शिवप्रकाश सावल यांच्या एका निर्णयामुळे अकोला व परिसरातील हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.



"या मेडिकलवर कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता वाजवी आणि माफक किमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळाले. यामुळे सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट आणि वेळ दोन्ही वाचला आहे."


शुभम उगले, (ग्राहक) 

कोरोना रुग्ण नातेवाईक



अकोल्यातील कोरोना स्थिती


एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३१०१५

मयत-५१३

डिस्चार्ज-२६४१०

दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०९२



सध्या कोरोनाच्या या संकट घडीत अनेक जण माणुसकी हरवत चालली आहेत. मात्र अकोला येथील दत्त मेडिकलने दिलेला हा माणुसकीचा परिचय निश्चित वाखाणण्या सारखा आहे. राज्यातील इतर औषध विक्रेत्यांनी देखील कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत ही बाब आत्मसात करणे गरजेचे झाले आहे, एवढे मात्र निश्चित.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा