Coronavirus: Akola: कोरोनाशी लढण्याकरता जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना उभ्या करणार- संजय धोत्रे

    ना.संजय धोत्रे,केंद्रीय राज्य मंत्री




लक्षवेधी मुद्दे

*सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व पंदेकृवि मध्ये 500 बेडचे अस्थायी कोविड रुग्णालय सुरु करण्याची केली मागणी 



*नागरिकांनी जवाबदारी लक्षात घेऊन स्वतःची व समाजाची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन






भारतीय अलंकार न्युज 24

अकोला: शहर व जिल्ह्यातील  covid-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी आज जिल्ह्यातील सद्य परिस्थिती बाबत माहिती घेवून, भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी पुरेश्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदतीचा हात मागितला आहे.  


वैद्यकीय तपासणी व उपचार करिता अकोला, बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यातील रुग्ण अकोल्यात येत असतात. त्यामुळे सद्य परिस्थिती  पुरेशा उपाय योजनेच्या संदर्भात व भविष्यात येणारी अडचण लक्षात घेता याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून अकोलेकरांसह, पश्‍चिम विदर्भाच्या येणारी अडचण या संदर्भात मार्गदर्शन तसेच केंद्र व राज्य सरकारला मदतीची हाक घातली आहे. 




अकोला शहरावर चार जिल्ह्याचा भार येत असून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी व पंजाबराव कृषी विद्यापीठ क्षेत्रात पाचशे बेडचे अस्थायी मेगा कोविड हॉस्पिटल संदर्भात उपाय योजना, ऑक्सिजन तसेच इतरही  आरोग्य सुविधा संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार डॉ.हर्षवर्धन यांच्याशी सुद्धा त्यांनी संपर्क साधला आहे. तसेच नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अकोलेकरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे वचन दिले आहे.




केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आपले सहकारी जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तसेच यासंदर्भात आरोग्य प्रशासन व आरोग्य विभागातील जाणकारांची मत जाणून पर्यायी उपाय योजने संदर्भात चर्चा विनिमय करत आहे. वेळ पडल्यास युद्धस्तरावर उभारणी करण्याची तयारी करण्यासाठी अकोलेकरांनी सुद्धा प्रशासनाला साथ द्यावी, असे भावनात्मक निवेदन ना. धोत्रे यांनी केले.



नागरिकांना आवाहन


घराच्या बाहेर पडू नका ही साखळी तोडण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून आपल्या परिवाराचे, समाजाचे रक्षण करणे आपले कर्तव्य असून सारे दोष सरकार न देता आपले कर्तव्य म्हणून घराबाहेर पडू नये. आजार असेल तर त्वरित उपचार करा त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्या मागे या महिन्यातच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधी, व्यायाम आपण करत होतो याकडे दुर्लक्ष करू नका. शारीरिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा. प्रसन्न रहा सकारात्मक विचाराने विचार करून घराबाहेर न पडता कार्य करा असे नम्र आवाहन ना. धोत्रे यांनी केले आहे.




टिप्पण्या