corona update:Akola: आज सकाळी २०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; नऊ जणांच्या मृत्यूची नोंद ,रॅपिड ॲन्टीजेन मध्ये ८० पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*
 
*आज रविवार दि. ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल- १५५७*
*पॉझिटीव्ह-२०४*
*निगेटीव्ह-१३५३*


 
आज सकाळी २०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ६२ महिला व १४२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात पारस येथील १६, अकोट येथील १४, कौलखेड येथील १०,पातूर, बाळापूर येथील प्रत्येकी  नऊ,  मुर्तिजापुर,साहित, गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सात,  तेल्हारा येथील सहा, डाबकी रोड, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, शास्त्रीनगर येथील चार, तरोडा खानापुर, एन पी कॉलनी, मलकापूर, लोणी कदमपूर येथील प्रत्येकी तीन, कापशी, गजानन नगर, गोकुळ कॉलनी, कीर्ती नगर, शिवर,  लहान उमरी, देऊळगाव, खडकी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित खदान, निम्बि,  दहातोंडा, कन्हेरी सरप,  नवापूर, चिखलगाव,  विझोरा,  हिंगणा,  आलेगाव, शिवनार,  बारालिंग, पास्टुल,  देवी खदान, राधाकिसन प्लॉट,  तापडीया नगर,  न्यू तापडीया नगर, तारफाईल, जठारपेठ, महान,  बेलुरा, बार्शी टाकळी, श्रीराम नगर,  महसूल कॉलनी,  वरुर, वलवाडी,  रविनगर, बोरगाव मंजू, अमान खा प्लॉट,  साई नगर, आदर्श कॉलनी,  रेणूका नगर, कासरखेड, जवाहर नगर,  गितानगर, खडकी,  बटवाडी,  चांदूर, आरोग्य नगर,  कासुरा, रणपिसेनगर,  गायत्री नगर,  बालाजी नगर,  चैतन्यवाडी, देशमुख फाईल, जुने शहर, गोडबोले प्लॉट,  अनिकट,  हरिहर पेठ,  शिवसेना वसाहत,  रजपुत पुरा,  बंजारा नगर,  अकोट फाईल,  तोष्णिवाल ले आऊट,  मोठी उमरी आणि उगवा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.


 
 
दरम्यान आज नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात  खडकी येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.३१ मार्च रोजी दाखल केले होते. अन्य खरप येथील ५८ वर्षीय महिला असून या महिलेस दि.६ रोजी दाखल केले होते. अन्य रुग्ण ५४ वर्षीय जठारपेठ येथील पुरुष असून  या रुग्णास दि.९ रोजी दाखल केले होते. तर अन्य रुग्ण वाडेगाव ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय महिला असून या महिलेस दि.८ रोजी दाखल केले होते. तसेच अकोट येथील ७५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.७ रोजी दाखल केले होते. डाळंबी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास  दि.७  रोजी दाखल केले होते. तर अन्य विवरा ता. पातूर येथील  ६७ वर्षीय पुरुष रुग्ण असून  या रुग्णास दि.८ रोजी दाखल केले होते. तर अन्य मोठी उमरी येथील  ५० वर्षीय महिला असून  दि.९ रोजी दाखल केले होते. तर वाडेगाव ता. बाळापुर येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास  दि.७ रोजी दाखल केले होते.


 
दरम्यान काल (दि.१०) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात ८० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
 
*आता सद्यस्थिती*
 
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४४४४+६०९१+१७७= ३०७१२*
*मयत-५०८*
*डिस्चार्ज-२६१९१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०१३*
 
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा*

टिप्पण्या