corona update:Akola: शुक्रवार सकाळ अहवाल: 375 नवे बाधित; पाच जणांच्या मृत्यूची नोंद

            *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १०८६*
*पॉझिटीव्ह-२३१*
*निगेटीव्ह-८५५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९२ महिला व १३९  पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील १६, पारस आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी १०, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, भरतपूर येथील प्रत्येकी सात, मलकापूर, जीएमसी येथील प्रत्येकी सहा,  जुने शहर पाच, जुने आरटीओ ऑफिस चार, बार्शी टाकळी, व्हीएचबी कॉलनी, कीर्तीनगर, कळंबा बु., राऊतवाडी, जठारपेठ, तापडीया नगर, सालतवाडा, रामनगर, राहेर, तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन,  आदर्श कॉलनी, गुडधी, पिंपळेनगर, बाळापूर, कोठारीवाटिका, तोष्णिवाल ले आऊट, कृषी नगर, शास्त्री नगर, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प, मासा,  तांदळी, महाकाली नगर, वानखडे नगर, अकोट,  गितानगर, कलेक्टर कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  जांभळून, मिर्जापूर, आझाद कॉलनी,  लक्ष्मी नगर,बंजारा नगर, पक्की खोली, गायगाव, गौतमनगर, द्वारकानगरी, राधाकिसन प्लॉट, डोंगरगाव, रामनगर,  घुसर, खेतान नगर, बोरगाव मंजू, कान्हेरी गवळी, आंबोरा, शिवनी, खिरपुरी, कोळासा, अडोळ बु., जवाहनगर, वृंदावन नगर, विजोरा, दुर्गाचौक, गोकुळपेठ, हातगाव, ज्योतीनगर, इंदिरानगर, सिटी कोतवाली, कान्हेरी सरप, शिवसेना वसाहत, आळशी प्लॉट, कुंभारी, निंभोरा, पत्रकार कॉलनी, शिवाजी नगर, विजय नगर, केशव नगर, गजानन नगर, वाशींबा, हरिहरपेठ, किल्ला चौक, कार्ला, हाता, चांदूर, बाजोरियानगर, मानकी, उगवा, सावंतवाडी, कपिलवस्तू नगर, नायगाव, राधाकिसन प्लॉट, महसूल कॉलनी, म्हैसांग, रिधोरा, छोटी उमरी, पिंपळखुटा, पातूर, घनेगाव, वरुड, देवळी, बोथडी, ताथोड नगर, विजय नगर,  वस्तापूर, पळसोबढे, शिवाजी पार्क, आडगाव, लाहोरी, बळवंत कॉलनी, कापशी, पार्वती नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.



आज पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात महसूल कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक अकोट फाईल येथील  ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच सराळा ता. बार्शी टाकळी येथील  ५५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते.  तर वाशीम बायपास येथील ९० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. या व्यतिरिक्त एक अनोळखी ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णास दि.१५ रोजी मृतावस्थेतच दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल (दि.१५) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात १४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५६९०+६६७९+१७७= ३२५४६*
*मयत-५४४*
*डिस्चार्ज-२७५६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-  ४४३८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या