corona update: अकोला: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-५००; दहा जणांच्या मृत्यूची नोंद, ७५२ जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २७ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १६१७*
*पॉझिटीव्ह-३३४*
*निगेटीव्ह-१२८३*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३३४+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १६६= एकूण पॉझिटीव्ह-५००



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३३४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३४ महिला व २०० पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३२, अकोट-५४, बाळापूर-२१, तेल्हारा-तीन, बार्शी टाकळी-सहा, पातूर-चार, अकोला-२१४. (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१८९)



आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पारस येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष असून या पुरुष दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील ४० वर्षीय पुरुष असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील १९, कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६३० असे एकूण ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२९९८६+८३८०+१७७= ३८५४३*
*मयत-६५५*
*डिस्चार्ज-३२५३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५३५३*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या