corona update: अकोला: आज एकूण पॉझिटीव्ह- ४९४; नऊ जणांच्या मृत्यूची नोंद

               *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २४ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २१८८*
*पॉझिटीव्ह-३८०*
*निगेटीव्ह-१८०८*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३८०+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११४= एकूण पॉझिटीव्ह- ४९४



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३८० अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४२ महिला व २३८ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-२५, अकोट-८६, बाळापूर-२६, तेल्हारा-१६, बार्शी टाकळी-नऊ, पातूर-२७, अकोला-१९१. (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-१७३)



आज दिवसभरात नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मलकापूर येथील ५८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कारंजा ता.मुर्तिजापूर येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, दहिगाव बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ६९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मोठी उमरी येथील ६७ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, वलगाव ता. बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर  येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजार येथील ६४ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच महान येथील ५२ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. 



 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ५३५ असे एकूण ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२८९९९+८०२७+१७७= ३७२०३*
*मयत-६१९*
*डिस्चार्ज-३०२७१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६३१३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या