corona update: आज दिवसभरात ३३८ नवे कोरोना बाधित; ७ रुग्णांचा मृत्यूची नोंद

              *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १०८७*
*पॉझिटीव्ह-२३१*
*निगेटीव्ह-८५६*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २३१+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १०७= एकूण पॉझिटीव्ह- ३३८



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात २३१ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९७ महिला व १३४ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-२७, अकोट-नऊ, बाळापूर-चार, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-१८, पातूर-१२, अकोला-१६०. (अकोला ग्रामीण-१५, अकोला मनपा क्षेत्र-१४५)

आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात काजळेश्वर, ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खदान येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते. बोरगाव मंजू येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते. महान ता.बार्शीटाकळी येथील  २८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील  ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तर येलवन बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर बोरगाव ता. मूर्तिजापूर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७, ठाकरे हॉस्पीटलमुर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथून एक, समाज कल्याण मुलांचे वस्तीगृह येथून ११, देवसार हॉस्पीटल येथून तीन, अकोला ॲक्सीडेंट येथून चार, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून दोन, हारमोनी हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून  सात, आरकेटी येथून पाच, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तर होम आयसोलेशन मधील १७१ असे एकूण २७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२६८३६+७१८८+१७७= ३४२०१*
*मयत-५६७*
*डिस्चार्ज-२८९६१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४६७३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या