corona update: आज सकाळी १७० जणांचे पॉझिटीव्ह; रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये ११० पॉझिटीव्ह, पाच जणांच्या मृत्यूची नोंद

              *कोरोना अलर्ट*
                                     file image

*आज शनिवार दि. १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ९७४* 
*पॉझिटीव्ह-१७०*
*निगेटीव्ह-८०४*


*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १७० जणांचे पॉझिटीव्ह अहवाल आले. त्यात ६१ महिला व १०९ पुरुषांचा समावेश आहे. त्यात कौलखेड येथील ११, मोठी उमरी व तेल्हारा येथील आठ, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सात, पारस, मलकापूर,  शास्त्री नगर, आळशी प्लॉट येथील प्रत्येकी पाच,  तापडीया नगर येथिल प्रत्येकी चार, जीएमसी, केशव नगर, बाभुळगाव, जठारपेठ,  गितानगर येथील प्रत्येकी तीन, तर आपातापा रोड, पातूर, डोंगरगाव, जुनेशहर,  बाळापुर,  चांदूर,  शिवनी, गोरक्षण रोड,  बार्शी टाकळी,  गिरीनगर, खडकी, रामदास पेठ,  सुधीर कॉलनी, रघुनंदन सोसायटी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत पिंपळ खुटा,  पिंजर, मोहराळ, साल्पि, वाल्पि,  वाघजाळी, मनुताई कन्या विद्यालय,  म्हैसपूर,  आदर्श कॉलनी,  दापुरा ता. तेल्हारा,  कापशी तलाव,  कान्हेरी गवळी,  शिवसेना वसाहत,  शिवर,  लहान उमरी,  उगवा, गंगानगर,  दानोरी,  हाजी नगर,  रामनगर, बोरगाव, कन्हेरी,  हरिहरपेठ, रिधोरा,  वाडेगाव,  शेलार फाईल,  अनिकट,  शिवनगर,  विजय नगर, रचना कॉलनी, कोळवई,  बंजारा नगर,  रमेशपूर,  निमवाडी,  वाशीम बायपास,  श्रावगी प्लॉट,  भरतपूर,  कीर्तीनगर,  सहकार नगर,  कामा प्लॉट,  रतनलाल प्लॉट,  गजान नगर,  वाडेगाव, बालाजीनगर,  शिवनी खदान,  उमरी,  गुडधी, शेलाड ता. बालापुर,  तोष्णिवाल लेआऊट,  रणपिसेनगर,  कृषीनगर,  जवाहरनगर,  दुर्गा चौक, गोकुळ कॉलनी,  विजय नगर, बोरगाव मंजू,  अकोट फाईल,  सोनाळा व नायगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान काल (दि.९)रात्री  रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट चा अहवाल प्राप्त झाला. त्यात ११० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



आज पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात  डाबकी रोड येथील ३५ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला या महिलेस दि.९ रोजी दाखल करण्यात आले होते. पोळा चौक येथील ५२ वर्षीय पुरुष या रुग्णास दि.६ रोजी दाखल केले होते. माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते. तर डाबकी रोड येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.९ रोजी मृतावस्थेत दाखल केले  होते.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४२२०+६०११+१७७= ३०४०८*
*मयत-४९७*
*डिस्चार्ज-२५८१५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०९६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या