corona update: Akola: आज दिवसभरात ३६८ नवे रुग्ण;सायंकाळी आणखी तिघांचा मृत्यू

            *कोरोना अलर्ट*
                                      file image

*आज मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल- १२२२*
*पॉझिटीव्ह-२३१*
*निगेटीव्ह-९९१*


*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) १३७+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ९४+ रॅपिड १३७=३६८



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ९४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ३४ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील ११, बार्शीटाकळी येथील नऊ, कौलखेड येथील सात, मलकापूर येथील पाच, खडकी येथील चार, राऊतवाडी, मोठी उमरी व पिंजर येथील प्रत्येकी तीन, बहादुरा, रामदासपेठ, डाबकी रोड, जवाहर नगर, बलवंत कॉलनी, खदान व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नया अंदुरा, खेडकर नगर, आपातापा रोड, निबंधे प्लॉट, जपान जीन, अनिकट, अगरबेस, मालीपुरा, तार फैल, रिंगल टॉकीज, अंबिका नगर, जूने शहर, विजय नगर, सिंधी  कॅम्प, तेल्हारा, निमवाडी, रिंग रोड, लेडी हार्डीग रोड, पिकेव्ही, शिवार, आरटीओ रोड, हरिहर पेठ, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, किर्ती नगर, गिरी नगर, नर्सीग हॉस्टेल, तरोडी, जीएमसी, आळशी प्लॉट, रतनलाल प्लॉट, हिंगणा फाटा, नफेवाडी, वाडेगाव ता.बाळापूर व धानेगाव ता.बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे



दरम्यान आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून तिघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष असून त्यांना दि. २ रोजी दाखल केले होते. तर अन्य तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला असून  या रुग्णास दि. २ रोजी दाखल केले होते. तसेच कोठारी वाटीका नं.८ येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, देवसार हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, याक्विन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, हैदर उम्मत हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, बाईज हॉस्टेल दोन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २२८, असे एकूण ३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४८९५+६३२२+१७७= ३१३९४*
*मयत-५२८*
*डिस्चार्ज-२७०९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३७७३*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या