corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-५३७ रुग्ण; ११ जणांच्या मृत्यूची नोंद, ४६८ जणांना डिस्चार्ज

             *कोरोना अलर्ट*
                                       file photo

*आज शुक्रवार दि. ३० एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १७५४*
*पॉझिटीव्ह-३३६*
*निगेटीव्ह-१४१८*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३३६+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २०१= एकूण पॉझिटीव्ह-५३७



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३३६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३९ महिला व १९७ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-५२, अकोट-३७, बाळापूर-३४, तेल्हारा-२३, बार्शी टाकळी-१९ पातूर-१७, अकोला-१५४. (अकोला ग्रामीण-२८, अकोला मनपा क्षेत्र-१२६)



आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मोठी उमरी येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य लोकमान्य नगर ता.बाळापूर येथील ८३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, जूने राधाकिसन प्लॉट येथील ७१ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. कोथळी ता. बार्शीटाकळी  येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवपूर येथील २० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच राहेर ता. पातूर येथील ७४ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच तीन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात  मोठी उमरी येथील ६२ वर्षीय महिला असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य बाळापूर येथील ६८ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ७८ वर्षीय महिला असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, केअर हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथील १४, कोविड केअर सेंटर तेल्हारा  येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर पास्टूल येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन,  देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३७० असे एकूण ४६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३१०९५+८८८८+१७७= ४०१६०*
*मयत-६८९*
*डिस्चार्ज-३४१६९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५३०२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या