corona update: Akola:एकूण पॉझिटीव्ह-३७१; सोळा जणांच्या मृत्यूची नोंद , ७३७ जणांना डिस्चार्ज

                *कोरोना अलर्ट*



*आज सोमवार दि. २६ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १४०३*
*पॉझिटीव्ह-२६४*
*निगेटीव्ह-११३९*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २६४+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १०७= एकूण पॉझिटीव्ह-३७१



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात २६४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९४ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१६, अकोट-१२, बाळापूर-३२, तेल्हारा-१९, बार्शी टाकळी-दोन, पातूर-५५, अकोला-१२८. (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१०३)



आज दिवसभरात १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहातोंडा ता. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, रामदासपेठ येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, किनखेड ता. बार्शीटाकळी येथील ५० वर्षीय पुरुष असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर मो. अली रोड सिटी कोतवाली येथील ६१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील ३९ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खदान येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, देवरी ता.अकोट येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर  आंबेडकर नगर येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. चिखलगाव येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. व्याळा ता. बाळापूर येथील वर्षीय पुरुष ६५ रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालयातून तिघांचे मृत्यू झाले. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ७६ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, सिंधी कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते तर गोरक्षण रोड येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, पाटिल हॉस्पीटल येथील एक, अर्थवा हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील सात, यक्कीन हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील १७ तर होम आयसोलेशन मधील ६५५ असे एकूण ७३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२९६५२+८२१४+१७७= ३८०४३*
*मयत-६४५*
*डिस्चार्ज-३१७८३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५६१५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या