corona update: Akola: एकूण पॉझिटीव्ह- ४८२;आठ जणांच्या मृत्यूची नोंद ,१५४ जणांना डिस्चार्ज

             *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २० एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १७२७*
*पॉझिटीव्ह-२८१*
*निगेटीव्ह-१४४६*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २८१+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २०१= एकूण पॉझिटीव्ह- ४८२



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात २८१ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १११ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१८, अकोट-पाच, बाळापूर-१६, तेल्हारा-१५, बार्शी टाकळी-नऊ, पातूर-सहा, अकोला-२१२. (अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्र-१७९)



आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खिरपूरी ता.बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खडकी येथील ७५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसांग येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, रिधोरा ता.बाळापूर येथील ७७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास   दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील ५३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात पुरुष रुग्णास दि. १९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तसेच रिधोरा ता.बाळापूर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णास दि.११ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, आरकेटी येथून २७, इंदिरा हॉस्पीटल येथून आठ, युनिक हॉस्पीटल येथून दोन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, अकोला ॲक्सीडेंट येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, तर होम आयसोलेशन मधील ४० असे एकूण १५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२७११७+७३८९+१७७= ३४६८३*
*मयत-५७५*
*डिस्चार्ज-२९११५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४९९३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या