corona update: Akola: आज सकाळी २४५ पॉझिटीव्ह ; तिघांच्या मृत्यूची नोंद,रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये १२१ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*
                                        file photo

*आज बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १६४७* 
*पॉझिटीव्ह-२४५*
*निगेटीव्ह-१४०२*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १५२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १७, आलेगाव येथील १५, बोरगाव मंजू, कौलखेड, तेल्हारा व मोठी उमरी येथील प्रत्येकी ११, खडकी येथील नऊ, सिंधी कॅम्प येथील सात, पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा, गिता नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी, बार्शीटाकळी, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, उमरी, दापूरा, राऊतवाडी, हरिहर पेठ, वाडेगाव, अमाखाँ प्लॉट, शिवाजी नगर व कोठारी वाटीका येथील प्रत्येकी तीन, वरखेड, कैलास टेकडी, मनब्दा, केशव नगर, तुकाराम चौक, खदान, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट,  पिंजर, अकोट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, अंबिका नगर, वाशिम बायपास, रजपूतपुरा व अनिकट येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित शेलद, पिंपरी, किर्ती नगर, शिवपूर, एनपी कॉलनी, गोळेगाव, पिंपळगाव काळे, हिवरखेड, खेल देशपांडे, वांगरगाव, बोचरा, बावने सोनोग्राफी क्लिनिक, तारफैल, अमृतवाडी, पंचशिल नगर, दुर्गा चौक, चांदुर, हिंगणा रोड, बालाजी नगर, गोकूल कॉलनी, गुडधी, निशांत टॉवर जवळ, न्यु भागवत प्लॉट, सिंध्दखेड, गड्डम प्लॉट, पैलपाडा, मोगाव, श्रावंगी प्लॉट, शास्त्रीनगर, दसरा नगर, जनेशहर रोड, लक्ष्मी नगर, बैदरखेड, कच्ची खोली, बाजार नगर, गायत्री नगर, कॉग्रेस नगर, गणेश कॉलनी, आळसी प्लॉट, देशमुख फैल, कृषी नगर, जूने शहर, भारती प्लॉट, दगडी पूल, बलवंत कॉलनी, गिरी नगर, मारोती नगर, पनज, न्यु तापडीया नगर, पातूर, उकडी बाजार, नकाक्षी व सुकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पंचशील नगर येथील ७२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ८ रोजी दाखल केले होते. तर अन्य बोरगाव मंजू येथील ६३ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ८ रोजी दाखल केले होते, तर ७० वर्षीय दहिहांडा येथील पुरुष असून  या रुग्णास दि. १३ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १२१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५१४०+६४४३+१७७= ३१७६०*
*मयत-५३१*
*डिस्चार्ज-२७०९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४१३६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या