corona update: Akola: आज सकाळी १३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; नऊ मृत्यूची नोंद

              *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ६८३*
*पॉझिटीव्ह-१३७*
*निगेटीव्ह-५४६*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४६ महिला व ९१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अमाखाँ प्लॉट व मोठी उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, गीता नगर, पारस कॉलनी व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, बार्शीटाकळी, राम नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी चार, पिंजर, कोलोरी, रणपिसे नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, बोरगाव मंजू, बाळापूर,  अकोट, ख्रिरपूर, शिवार, जठारपेठ, देवकी नगर व हरिहर पेठ येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित हिंगणा, गोकूल कॉलनी, न्यू बस स्टँड, लक्ष्मी नगर, गड्डम प्लॉट, वनीरंभापूर, देशमुख फैल, सोपीनाथ नगर, शिवाजी नगर, पार्वती नगर, निंभोरा,पैलपाडा, देगाव, दहिहांडा, तेल्हारा, पातूर, मांडोली, कंळबा ता.बाळापूर, हसनापूर, गोकूल कॉलनी, खामखेड, पारस, शेलद, राजीव गांधी नगर, रिंग रोड, दानोरी ता.अकोट, राधेनगर, गौतम रोड, सिंधी कॅम्प, रतनलाल प्लॉट, लहान उमरी, तेल्हारा, जवाहर नगर, व्याळा ता.बाळापूर, वर्धमान नगर, मातानगर, शिवनी, महाकाली नगर, शिवसेना वसाहत, गोपालखेड, वाडेगाव, रामदासपेठ व विराहित येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज नऊ मृत्यूची नोंद झाली. त्यात हमझा प्लॉट, जूने शहर येथील ४४ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ७ रोजी दाखल केले होते. तर अन्य नायगाव येथील ४० वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते, आळसी प्लॉट येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते.  तर ४२ वर्षीय पारस येथील पुरुष असून  या रुग्णास दि. ६ रोजी दाखल केले होते. अन्य रुग्ण शास्त्री नगर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १० रोजी दाखल केले होते, भरतपूर ता.बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १२ रोजी दाखल केले होते, शिवसेना वसाहत येथील ५८ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ८ रोजी दाखल केले होते, खदान येथील ७४ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ८ रोजी दाखल केले होते.  तसेच दगडीपारा येथील ३६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १३७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४८०१+६३२२+१७७= ३१३००*
*मयत-५२५*
*डिस्चार्ज-२६७६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४०१२*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार) 

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या