corona update: Akola: आज दिवसभरात ३००;सायंकाळी आणखी दोघांचा मृत्यू

               *कोरोना अलर्ट*

                                     file photo
 
*आज शनिवार दि. १० एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकळ) प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल- १३९१*
*पॉझिटीव्ह-१९०*
*निगेटीव्ह-१२०१*

आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१७०+आरटीपीसीआर(सायंकाळ)-२०+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-११०= ३००

*अतिरिक्त माहिती*

सायंकाळी २० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील  कौलखेड येथील तीन, डाबकी रोड, गितानगर, केशव नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  कन्हेरी गवळी, गोरक्षण रोड. वरखेड ता. बार्शी टाकळी, तुकाराम चौक,  अशोक नगर,  मलकापूर, सिव्हील लाईन, तेल्हारा आणि शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.



सायंकाळी प्राप्त माहितीनुसार, खाजगी रुग्णालयात  दोघांचा मृत्यू झाला. त्यात खोलेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण ७५ वर्षीय माजरी ता. बाळापूर येथील पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते.


 
दरम्यान दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सात, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, आधार हॉस्पिटल मुर्तिजापुर येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून  चार,  नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापुर येथून  एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून  चार, समाजकल्याण मुलांचे वसतीगृह येथुन तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, देवसर हॉस्पिटल येथून पाच, युनिक हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशन मधील २८९ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१ असे एकूण ३७६ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४२४०+६०११+१७७= ३०४२८*
*मयत-४९९*
*डिस्चार्ज-२६१९१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३७३८*
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या