Corona lockdown: ...अन्यथा परवापासून दुकाने उघडणार; अकोल्यातील व्यापारी वर्गाची प्रशासनास चेतावणी



भारतीय अलंकार 24

अकोला:कोरोना बाधितांचा साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या 'ब्रेक दी चेन' ला अकोल्यात पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, लॉक डाउनच्या नियमात बदल करून इतर दुकानांना परवानगी देण्यात आली नाही तर परवापासून दुकाने सुरू करण्याची चेतावणी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिली.




अकोल्याच्या मुख्य बाजारपेठेत सध्या शुकशुकाट पसरला आहे. व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद करून सहकार्य केले.राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णवाढीची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत ब्रेक दी चेन ही मोहीम राबवली आहे. या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची दुकान वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.आज अकोल्यातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवला असला तरी परवापासून राज्य सरकारला असहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली आहे.



बार मालकांचे निवेदन


Lockdown चा फटका बार मालकांना देखील बसत आहे. यासाठी बार मालकांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे बारमधून पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. 




व्यापारी वर्गाला दुकाने सुरू करण्याची परवानगी न दिल्यास हा वाद पेटणार असे संकेत दिसत आहे. त्यामुळे आता व्यापारी आणि प्रशासन यामधील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टिप्पण्या