- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Break the chain: नियम केले आणखी कडक; गुरुवारी रात्री ८ वाजतापासून निर्बंध लागू, नियम न पाळल्यास सहन करावा लागणार आर्थिक भुर्दंड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले. ब्रेक द चेन या निर्बंधांत काही बदल करून बुधवारी आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश गुरुवार २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून लागू होणार आहेत. १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे.
काय आहेत नवे बदल
*या नव्या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद राहील.
*सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी हजर राहू राहतील. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
*खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी आहे. मात्र, विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली. नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
*लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली, परंतु त्यासाठी फक्त २ तास वेळ मर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. नियमाचे पालन न झाल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
असे आहेत नियम
* उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
* १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
* सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
* सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
* राज्यात जिल्हा बंदी लागू
* अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
*सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
* खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणासाठी परवानगी
* सार्वजनिक वाहतूक ५०% क्षमतेने चालणार
* एसटी बस वाहतूक ५०% क्षमतेने सुरू राहणार
* अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
* खासगी वाहतूकदारांने नियम मोडल्यास १० हजार दंड
* सरकारी कार्यालयांमध्ये १५% उपस्थिती
* अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालय १५% हजेरीने चालणार
* लग्न समारंभासाठी २५ जणांना फक्त २ तासांसाठी परवानगी
* लग्नाचे नियम मोडल्यास ५० हजार दंड भरावा लागणार
* बाहेरून येणाऱ्याना १४ दिवस होम क्वारंटाईन करणार
* होम क्वारंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
* कोरोना संक्रमित रुग्णांची संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
* फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा