black market: remedivir:Positive story: एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार तर दुसरीकडे मानवधर्म जोपासणारा हा अवलिया!

              Positive story

On the one hand, the black market of remedivir injection and on the other hand, 'Avaliya' who cultivates humanism






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना आजारावर परिणाम करणारे रेमडेसीवीर इंजेक्शन सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक औषधी दुकानांवर धाव घेतात. मात्र, तेथेही (अपवाद वगळता) कृत्रिम टंचाई निर्माण करून एकतर चढ्या भावाने विकतात. किंवा त्याचा हस्तक दुकानासमोर उभा करून ब्लॅकने (काळा बाजार) अव्वाच्या सव्वा भावात उपलब्ध करून देतो. रॅमिडीसीविरचा हा काळाबाजार आता उघडकीस आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर, भुसावळ आणि आता अकोल्यातही याचे लोण पसरले आहे. एकीकडे ही भयंकर परिस्थिती असताना अकोल्यातील दत्त मेडिकलचे संचालक शिवप्रसाद सावल  मानवधर्म निभावत आहेत.'ना नफा ना तोटा' या तत्वावर ते आपल्या दुकानातून रॅमिडीसीविरची विक्री करीत आहे.मात्र,आता त्यांना इंजेक्शनचा पुरवठा कमी झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी हतबलता दाखवून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाची माफी मागत फलक लावला होता.सेवा देवू शकत नसल्याने दिलगिरी व्यक्त करीत असल्याचा फलक त्यांनी आपल्या दुकान समोर लावला होता.



दरम्यान,पालकमंत्री बच्चू कडू परवा अकोला दौऱ्यावर असताना सावल यांची भेट घेवून, कोरोना संकटात माणुसकी जपत रुग्णांना आधार देवून, निस्पृह सेवा प्रदान करीत असल्याबद्दल आभार मानले.



काळ्याबाजारात २५ ते ३० हजार रुपयाला इंजेक्शन विकणाऱ्या टोळी पोलिसांनी गजाआड केल्या आहेत. काळा बाजार करणारे डॉक्टर आणि मेडिकल चालक या रॅकेटमध्ये असल्याचे उघडकीस आले आहे. मेडिकल क्षेत्रात लोक काळाबाजार करत असल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे हे वाम मार्गाने जाणारे तर दुसरी कडे  सावल यांच्या सारखे व्यवसायी समाजात आदर्श निर्माण करतात.




अकोला जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा.


यापूर्वी मिळणारा साठा 


जिल्ह्याला सिपला कंपनीचे 2 ते 3 दिवासात मिळत आहे आधी 500 इंजेक्शन मिळत होते. तर केडिला कंपनीचे 4 दिवसात 48 इंजेक्शन. तर सनफ्लॉवर कंपनीचे 15 दिवसात 160 इंजेक्शन यापूर्वी मिळायचे. 


सद्यस्थिती


सध्या सिपला कंपनीचे केवळ 250 इंजेक्शन मिळत आहे. आधी  500 मिळत होते. 250 इंजेक्शनचा अकोलाचा साठा नागपूरला देण्यात आला. त्यामुळे आता अकोल्यासाठी हा साठा 250 वर आला आहे. सुमारे 5 दिवसात अकोल्याला 700 च्या जवळपास इंजेक्शन मिळत आहे. म्हणजे रोजचे 135 च्या जवळपास.



अकोल्यात सध्या रोजची 700 इंजेक्शनची मागणी आहे अकोला शहरात सध्या दोनच औषध दुकानदारांना रेमडीसीवरचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा कमी होत असल्याने काही दिवसांपूर्वी  'ना नफा ना तोटा ' तत्वावर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दत्त मेडिकलने जनतेची माफी मागत इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे फलक लावले. गरिबांची आर्थिक लूट आणि पायपीट थांबवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्याची मागणी सिव्हिल लाईन येथील दत्त मेडिकलच्या संचालक शिवप्रसाद सावल यांनी केली आहे.

टिप्पण्या