Shri Ram Navami 2021: Akola: श्रीराम नवमी शोभायात्रा समितीची बैठक; राज्य सरकार व आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार उत्सव साजरा होणार

                                     File photo



भारतीय अलंकार 24

अकोला: रामभक्त अकोलेकर सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक संस्कार कार्यामध्ये व संस्कृती संवर्धन मध्ये सदैव मार्गदर्शक व पुढे असतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माण कार्यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग ही भक्ती आणि श्रद्धा अकोले करांची ईश्वर ईश्वर भक्ती संबंधी कृतीने सिद्ध झाले आहे. प्रभू रामचंद्रच्या जन्मदिनी सध्याच्या covid-19 च्या पार्श्वभूमीवर राम भक्तांनी संयमाने सरकार व आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करून तसेच रामनवमी शोभायात्रा समितीच्या प्रत्येक कार्यामध्ये तन मन धनाने अकोलेकर सहकार्य करतील, अशी अपेक्षा आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली.




स्थानिक खंडेलवाल भवन येथे श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.




बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास अनासने हे होते. तर मंचावर बिजमोहन चितलांगे डॉक्टर अभय जैन, अनिल थानवी, अशोक गुप्ता, वसंत बाछुका गिरीराज तिवारी, अनिल मानधने आदी विराजमान होते.




येत्या 21 एप्रिल रोजी रामनवमी येत असून परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार व आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करणे गरजेचे आहे. यावर सगळ्यांनी एक मताने पाठिंबा दर्शविला व रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने covid-19 च्या काळामध्ये सत्तर दिवस रामप्रसाद प्रवासी कामगारांना मदत शैक्षणिक सोय आरोग्य सोय तसेच साडेचारशे पीडितांना रामप्रसाद मदत देण्यात आली, असे सांगण्यात आले. 

तसेच राज्य सरकारच्या सूचनेचे पालन व आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करून परिस्थिती अनुसार निर्णय घेण्यात आले. तसेच साध्या पद्धतीने मागच्या वर्षी खंड न पडता रामनवमी साजरी करण्यात आली. अकोलेकरांनी घरोघरी दिवे लावले तसेच पाच ऑगस्ट रोजी खंडेलवाल भवन येथे साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावर्षी देखील यासंदर्भात परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाची परवानगी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.




बैठकीत नवीन गुप्ता, राम ठाकूर मोहन गुप्ता, बाळकृष्ण बिडवई ,संदीप वाणी, कैलास रणपिसे, नितीन जोशी, पुष्पा वानखेडे, मनीषा भुसारी, संतोषी शर्मा, वसुधा बिडवई, चंदा अग्रवाल, अलका देशमुख, रेखा नालट, कल्पना अडचुले, पद्मा अडचुले, मीराताई वानखेडे, जागृती वानखेडे, मालती रणपिसे, मनीष बाछुका, प्राध्यापक अनुप शर्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी तर संचलन गिरीराज तिवारी यांनी केले. आभार अनिल मानधने यांनी मानले.

टिप्पण्या