Prakash Ambedkar: VBA: राज्य सरकारने एका आठवड्यात मेळघाटातील वाघांची संख्या व सागवान चोरीचा अहवाल सार्वजनिक करावा-प्रकाश आंबेडकर





ठळक मुद्दे

*सरकार वाघांचे आहे की लांडग्याचे तेच मला समजत नाही 


*यशोमती ठाकुर यांच्या पालक जिल्ह्यात एखाद्या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या करणे ही बाब निंदनीय


*फोन टेपिंग डेटा सरकारकडे उपलब्ध आहे तर चौकशीची आवश्यकता काय ?




भारतीय अलंकार 24

अकोला: दिपाली चव्हाण मृत्यू प्रकरणी संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळुन निघाले असून मेळघाटात होणारी वाघांची व सागवानाची तस्करी ही दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची राज्य सरकारने एका आठवड्यात चौकशी करत मेळघाटातील वाघांची संख्या व सागवान चोरी बाबतचा अहवाल सार्वजनिक करावा अन्यथा त्यानंतर वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या निशाताई शेंडे हा अहवाल समोर आणतील. महिला व बालविकास मंत्री असलेल्या यशोमती ठाकुर यांच्या पालक जिल्ह्यात एखाद्या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या करणे ही बाब निंदनीय असल्याचे सांगून, हे सरकार वाघांचा आहे की लांडग्याच्या तेच मला समजत नाही, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे सुप्रिमो ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत हाणला.


महिन्याला शंभर कोटी वसुली हा कॅबिनेटचा की गृहमंत्र्यांचा निर्णय 


राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याकाठी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे नमुद केले. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी अद्यापही खुलासा न केल्याने हा निर्णय गृहमंत्र्यांचा की संपूर्ण कॅबिनेटचा होता असा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने त्वरित खुलासा करावा अशी मागणी आंबेडकर यांनी केली.



सरकार आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटकांची हातमिळवणी


माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिन्याकाठी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट पोलिस अधिकाऱ्याला दिले असल्याचे उघड झाले. त्यामुळे सरकार आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटकांची हातमिळवणी असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करीत सरकारवर निशाणा साधला.



फोन टेपींग मग चौकशीची आवश्यकता काय ?


गुप्तचर विभागाच्या रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला तसेच या प्रकरणी फोन टेपींगचा डेटा असल्याबाबत सुद्धा त्या म्हणाल्या जर फोन टेपिंग डेटा सरकारकडे उपलब्ध आहे तर चौकशीची आवश्यकता काय ? अशा प्रश्न उपस्थित करत फोन टेपींग मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक करावी अशी मागणी यावेळी ऍड. आंबेडकरांनी केली.



टिप्पण्या