Political news: अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

                                      file photo



भारतीय अलंकार24

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.




मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.



राजीनामा मागचे कारण

                                      file photo

टिकटॉक कलाकार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. वनमंत्री  संजय राठोड यांच्या राजीनाम्या पर्यंत हे प्रकरण पोहचले. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेनं बैठक बोलाविली होती. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. मात्र, शिवसेनेकडून कोणताही अधिकृत दुजोरा दिल्या न गेल्याने राजीनामाचे गुढ वाढले होते.  


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले. काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. 




काय आहे प्रकरण


बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षाच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पुण्यातील हडपसर भागातील महमंदवाडी परिसरातील हेवन पार्कमध्ये ही घटना घडली होती. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आले होते. भाजपाकडून त्यांचे नाव घेऊन कारवाई करण्याची मागणी केली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.


टिप्पण्या