Political news: देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील नागपुरात दाखल होताच विमानतळावरून थेट संघ मुख्यालयात; मोहन भागवत यांच्या सोबत दीड तास चर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मुंबईहून नागपूरला रवाना झाले. आणि आज त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. एरवी मोहन भागवत अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता आणि प्रदेशाध्यक्ष यांची एकत्रित भेट घेत नाही. त्यामुळे अधिवेशन संपताच अशा प्रकारे भेट झाल्याने या चर्चेला उधाण आले आहे. साधारण अर्धा तास चाललेल्या या चर्चेत नक्की काय संवाद झाला ? हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.




भारतीय अलंकार 24

नागपूर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील नागपुरात दाखल होताच सकाळी विमानतळावरून थेट संघाच्या मुख्यालयात पोहोचले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये तब्बल दीड तास गुप्त वार्ता झाली. 


या गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. मात्र, मराठा आरक्षणावर त्यांच्यात चर्चा झाली असावी असे बोलल्या जात आहे.




प्रसार माध्यमांशी साधला संवाद


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असे  फडणवीस यांनी सांगितले.




“कोरोना वाढत असून सरकार त्याकडे लक्ष देत नाही, त्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. अधिवेशन असते त्याच्या आधी कोरोना वाढतो, सुरु असताना कमी होतो आणि संपल्यानंतर पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो. इतर वेळी दिसत नाही. परिस्थिती भयावह आहे त्यासाठी प्रभावी योजना राबवताना दिसत नाही,” असे देखील फडणवीस म्हणाले. 

.........








टिप्पण्या