Namkeen market fire: नमकीन मार्केट मध्ये दुकानांना आग: व्यापाऱ्यांना राज्य शासनाने त्वरित मदत करावी- आमदार शर्मा यांची मागणी




भारतीय अलंकार 24

अकोला: जुना भाजी बाजार नमकीन मार्केटमध्ये पंधरा दिवसात नऊ दुकाने आग लागून खाक झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन दल,  पोलीस तसेच त्या भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नाही. राज्य शासनाने या व्यापारी उद्योजकांना त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.





आज पहाटे तीन वाजता जूना भाजी बजार नमकीन मार्केट येथे शिवगंगा नमकीन सेंटरला आग लागून अमर कुकरेजा व सुरेश कुकरेजा यांच्या दुकानांना आग लागली. बाजूला असलेला सुरेका व रांदड परिवार बचावला. अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. पहाटे तीन वाजता लागलेली आग सकाळी दहा वाजता पर्यंत अग्निशमन दलाचे चार गाड्या बुजवण्यासाठी कार्यरत होत्या. 



आमदार शर्मा भेट 

आमदार गोवर्धन शर्मा यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळीची पाहणी करून कुकरेजा परिवार, सुरेका परिवार , रांदड परिवाराची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासंबंधी अभिवचन दिले या तसेच जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी या घटनेचा पंचनामा करावा, असे निर्देश दिले. 




यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गिरीश जोशी, किशोर अलीमचंदानी, हिरा कृपलानी, ब्रह्मानंद वालेचा, अजय शर्मा, अतुल शर्मा,  प्रकाश घोगलीया, सुरज भगेवार, गिरीराज तिवारी, अक्षय जोशी, प्रदीप रांदड, हरिभाऊ काळे, मनोज शाहू, सागर शर्मा, आशिष शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या