- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार 24
मुंबई: राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज नवी तारीख जाहीर करण्यात आली. आता २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकार MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSC च्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला. पुण्यातून या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. यात विरोधी राजकीय पक्षानी देखील उडी घेतली होती.
दरम्यान, या घोळाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांनी ट्विट करुन याबाबत खुलासा केला होता की. " माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल."
काल गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे होती. कोरोनाच्या कारणामुळेच परीक्षा पुढे ढकलली होती, पण आठवडाभरात ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मुख्य सचिवांना सांगून याबाबतचा घोळ मिटविण्याचे आदेश दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा