Katepurna Barrage: मंत्रिमंडळ निर्णय: काटेपूर्णा बॅरेज, पंढरी, गर्गा मध्यम प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता




भारतीय अलंकार 24

मुंबई: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरुळ कांबे गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या काटेपूर्णा बॅरेज, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्प आणि धारणी तालुक्यातील मौ.मान्सुधावडी येथील गर्गा मध्यम प्रकल्पांना आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.




काटेपूर्णा प्रकल्पास 533 कोटी 81 लाख,  पंढरी मध्यम प्रकल्पास 1 हजार 109 कोटी 23 लाख, गर्गा मध्यम प्रकल्पाला 494 कोटी 24 लाख इतक्या खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.




काटेपूर्णा प्रकल्पामुळे 13 गावांमधील 4 हजार 137 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पंढरी मध्यम प्रकल्पामुळे 40 गावांमधील 9 हजार 191 हेक्टर क्षेत्र, गर्गा मध्यम प्रकल्पामुळे 25 गावांमधील 4 हजार 281 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.


टिप्पण्या