Hanuman Jayanti 2021: हनुमान चालीसा पाठ मास: समाज कल्याणासाठी होळी पासून हनुमान जयंती पर्यंत हनुमान चालीसा पठण

                                      File image



भारतीय अलंकार 24

अकोला: श्रीराम नवमी शोभायात्रा समिती तर्फे यंदा नवीन वर्षाचा राजा व महामंत्री मंगळ असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण व्हावे, या हेतूने 28 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत दोन्ही तारखेची एकूण अंकशास्त्र याप्रमाणे नऊ येत असल्यामुळे मंगलचे दैवत श्री हनुमंत  असल्यामुळे श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने प्रत्येकानी आपापल्या घरी होळी पर्व पासून ते हनुमान जयंती पर्यंत हनुमान चालीसाचा अधिकाधिक पाठ करावा, असे आवाहन श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले आहे.




या अभिनव कार्यक्रमच्या  माध्यमातून 1300000 हनुमान चालीसाचा पाठ करण्याचा संकल्प भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे. मानव कल्याणा सोबत प्रत्येकाच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण व्हावे तसेच धार्मिक दृष्ट्या हनुमान चालीसाचे महत्व या वर्षाचे महत्व अंक ज्योतिषानुसार वैदिक कारणाने या कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





सहभागी होण्याचे आवाहन

प्रत्येकाने आपापल्या घरी हनुमान चालीसा पाठ 28 मार्च ते हनुमान जयंती 27 एप्रिल रोजी पर्यंत हनुमान चालीसाचा पाठ करावा. सर्व वर्गातील नागरिक, मातृशक्ती, युवाशक्ती यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांनी आपली नावे जास्तीत जास्त नोंदवावी व या कार्यक्रमात परिवार व आपल्या परिसराच्या विकासासाठी भौगोलिक सामाजिक आर्थिक विकास साधण्याकरिता या अभियानात सहभागी व्हावे, अशी आवाहन समितीतर्फे करण्यात आली आहे.




या समाज कल्याणकारी अभियान व कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ व श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्थेच्या वतीने करण्यात आले. या अभियानात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी व सर्व भक्तांनी आपले नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी किंवा गिरीश जोशी, विनय प्रकाशन या रिगल टॉकीज या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.




या अभियानात सहभागी होणाऱ्या भक्तांना श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था तसेच श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,अशी माहितीश्री रामनवमी शोभायात्रा समिती, श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ व श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्थाने दिली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा