corona update: अकोला:आज सकाळी ६८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह;एकाचा मृत्यू, रॅपिड टेस्ट मध्ये ७२ पॉझिटीव्ह

                 *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. २९ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ४१२* 
*पॉझिटीव्ह-६८*
*निगेटीव्ह-३४४*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ६८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३१ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील सात, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच,  कौलखेड, वाशिम बायपास, मोठी उमरी, आसरामाता कॉलनी येथील प्रत्येकी तीन, राधाकिसन समोर, बार्शीटाकळी, वसंत टॉकीज, शास्त्री नगर, तापडीयानगर व तेल्हारा येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित जूने शहर, बाबुळगाव, हनुमान नगर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, जामनेर, गोरक्षण रोड, नयागाव, आळसी प्लॉट, हिंगणारोड, येवलखेड, ज्योती नगर, खडकी, बाळापूर नाका, बिर्लाराम मंदिर, तळेगाव बाजार, शिवर, पंचशिल नगर, जीएमसी, सिंधी कॅम्प, राऊतवाडी, पातूर, वनीरंभापूर, बाळापूर, लहरिया नगर, सिंधखेड मोरेश्वर, बोरगाव मंजू व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ७२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२३२६+४८३७+१७७= २७३४०*
*मयत-४४७*
*डिस्चार्ज-२०२६०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६६३३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या