corona update: आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; दोघांचे मृत्यू, रॅपिड टेस्ट मध्ये ४९ पॉझिटीव्ह

            *कोरोना अलर्ट*


*आज शुक्रवार दि. २६ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३९२*  
*पॉझिटीव्ह-२४५*
*निगेटीव्ह-११४७*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६७ महिला व १७८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अंबुजा पारस व महान येथील प्रत्येकी १८, डाबकी रोड येथील १५, बाळापूर येथील १३, बार्शीटाकळी येथील ११, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर, जीएमसी व खदान येथील प्रत्येकी पाच,  पारस, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, एमआयडीसी, आपातापा रोड, रांजनखेड, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, मोठी उमरी, वाडेगाव व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, इंद्रा कॉलनी, गजानन नगर, बापू नगर, बेलखेड, पोपटखेड, शिवापूर, बायपास, तुकाराम चौक, व्हिएचबी कॉलनी, आदर्श कॉलनी, नायगाव, शिवणी, टाकळी व व्दारकानगर येथील प्रत्येकी दोन.


उर्वरित गोयका नगर, रामदेव ट्रेडर्स, सिरसो, कौलखेड जहागीर, माळराजुरा, महाकालीनगर, शिवाजी नगर, गंगा नगर, गाडगे नगर, न्यु रमेश नगर, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, पंचशिल नगर, देशपांडे प्लॉट, तळेगाव बाजार, चांदुर, पंचगव्हाण, कारला, दानापूर, निंबी, मैत्रनगर, पाटखेड, हातोला, झोडंगा, लोहगड, पैलपाडा, अडगाव, खेतान नगर, सिवर, झेडपी कॉलनी, नित्यानंद नगर, बुरर्डा,  शिवसेना वसाहत, बुधाळा, हार्तुण,कौलखेड गोमासे, हाता, किर्ती नगर, गौतम नगर, जाजू नगर, मुर्तिजापूर, मोहता मिल, आबेंडकर नगर, इस्लाम चौक, न्यु भिम नगर, शेळद, बटवाडी, बोरगाव मंजू, आसर खेड, पळसी बु., कसूरा, सांगली मोहाडी, लोहारा, जवळा, अकोट, हिगणा, गोरक्षणरोड, हिंगणा फाटा, टाकळी रोड, ओपन थेटर्स, खैर मोहम्मद प्लॉट, दगडी पुल, उन्नती नगर, भगतवाडी, स्वालंबी नगर, ईस्ट झोन, खरप, गणेश नगर, तांदळी व केडीया प्लॉट येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात खडकी, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य वाडेगाव, बाळापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.  



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२१६११+४४५९+१७७= २६२४७*
*मयत-४३७*
*डिस्चार्ज-१९३७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६४३३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या