- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. २४ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १७०४*
*पॉझिटीव्ह-३४१*
*निगेटीव्ह-१३६५*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २६३+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ७८+ रॅपिड ६६=४०७
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ७८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बाळापूर येथील नऊ, चिखलगाव येथील सहा, विराहित येथील पाच, शिवर, न्यु तापडीयानगर, बार्शीटाकळी व मनब्दा येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, जूने शहर, गोरक्षण रोड, खडकी, सुकळी व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आबेडकर नगर, अकोट फैल, आझाद कॉलनी, मोहमद पुरा, भरतपूर, कौलखेड, बाळापूर रोड,अशोक नगर, रतनलाल प्लॉट, कच्ची खोली, मोमीनपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बैद्यपुरा, डाबकी रोड, मुर्तिजापूर, आरोग्य नगर, बापू नगर, गिता नगर, खदान, तोष्णीवाल लेआऊट, ज्योती नगर, ऐश्वर्या नगर, अकोट, हातगाव ता. मुर्तिजापूर, देऊळगाव, व्याळा, सस्ती, हिरपूर, मोठीउमरी, जवाहर नगर, रणपिसे नगर, जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात अकोट फैल, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण उमरा, अकोट येथील ६७ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण रजपूतपुरा, अकोला येथील महिला रुग्ण असून या महिलेस दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, देवसारा हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील सात, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी पाच, हारमोनी हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, हॉटेल स्कायलार्क येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातुन १७, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील नऊ, ओझोन हॉस्पीटल येथील एक, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, समाज कल्याण हॉस्टेल येथील २७, अकोट कोविड केअर सेंटर येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील दोन, बाळापूर कोविड केअर सेंटर येथील चार, इंद्रायणी हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील १५२ जणांना असे एकूण ३०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२११२८+४२०९+१७७= २५५१४*
*मयत-४३४*
*डिस्चार्ज-१९०१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६०६७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा