corona update: अकोला: २४ तासात ४०० नवे पॉझिटिव्ह ; सायंकाळी ३ रुग्णांचा मृत्यू

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २० मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २१८३*
*पॉझिटीव्ह-३३०*
*निगेटीव्ह-१८५३*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२४७+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ८३+ रॅपिड ७०=४००



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ८३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २७ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, मुर्तिजापूर, खडकी व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, डाबकी रोड, वृंदावन नगर, खदान, मोठी उमरी, पक्की खोली, जीएमसी, संत नगर, गंगा नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित चांदुर, अशोक नगर, विठ्ठल मंदिरजवळ, न्यु जैन मंदिर, आळशी प्लॉट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, बिर्ला कॉलनी, राऊतवाडी, लाल बंगला, बदलापूर, डिएचडब्ल्यु हॉस्टेल, सुकळी, हिंगणा रोड, संतोष नगर, कपिलवास्तु नगर, रजपूतपुरा, इनकम टॅक्स चौक, एमआयडीसी, जूने आरटीओ रोड, निमवाडी, वाशिम बायपास, पक्की खोली, खद, तुकाराम चौक, पळसोबढे, बोरगाव मंजू, वरखेड, बायपास, पुनोती खुर्द, सेंट्रल जेल, अकोली जहागीर, हिवरखेड, रिंग रोड, विद्या नगर, कंवर नगर, गोकूल कॉलनी, माधव नगर, गीता नगर, सुधीर कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात कृषी नगर, अकोला येथील ४८ वर्षीय  पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर अकोला येथील ६८ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, पिंजर ता.बार्शीटाकळी येथील ६९ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथून आठ जणांना, असे एकूण ८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९७४५+३९४४+१७७=२३८६६*
*मयत-४२४*
*डिस्चार्ज-१७६६७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५७७५*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या